लेजर प्रिंटर्स पेज कॉऊंटिंग सेटिंग

       आज आपण लेजर प्रिंटर्सच्या पेज कॉऊंटिंग  सेटिंग बद्दल माहिती घेणार आहे .  माझ्याकडे Samsung ML १६४० हा प्रिंटर्स आहे.  ७ वर्षांपासून मी हा प्रिंटर्स वापरत आहे. काही प्रॉब्लेम्स नाही.   लेजर प्रिंटर्स इतर प्रिंटर्स पेक्षा वेगवान आणि प्रिंटाऊट परवडणारी असते. केव्हाही तुम्ही प्रिंट काढा,इंकजेट  प्रिंटर्स प्रमाणे हा दगा  देणार नाही.  
         आता महत्वाच्या मुद्द्यावर बोलू, या प्रिंटर्सद्वारे मी पहिल्या  २००० प्रिंट्स काढल्या, त्यानंतर प्रिंट येणं बंद झालं. मी कार्टीज चेक केलं. प्रिंटर्स केबल चेक केलं सगळं ठीक होतं पण प्रिंट  येत नव्हती.  असं का झालं असेल. मग मी नेटवर याबाबत शोध घेतला.  त्यावर मला उत्तर मिळालं. ते असं . 
          प्रिंटर्स निर्माता कंपनीने प्रिंटरमध्ये पेज कॉऊंटिंग सेटिंग करून ठेवलेली असते, ती अशी कि २००० प्रिंट्स निघाल्या कि पुढील प्रिंट्स निघणार नाही .  मग तुम्हाला नवीन कार्टीज विकत घ्यावे लागेल. जेणेकरून कंपनीचा फायदा व्हावा.   प्रिंटर्स ४-५ हजाराला आणि कार्टीज दिड -दोन हजाराला. हे काही परवडणारे नाही.  प्रत्येकवेळी कार्टीज घेणं परवडणार नाही.  मग यावर दोन उपाय आहेत.  पहिला म्हणजे प्रिंटर्स  कार्टीज सेटिंग २००० हजारवरून ० अशी रीसेट करणे. यासाठी तुम्हाला ३०० रुपये खर्च येऊ शकते किंवा प्रिंटर्स चिप (खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे) घ्यावी लागेल आणि प्रिंटर्स मधील चिपसोबत बदलवून घ्यावी लागेल. ह्या चिपची किंमत ५०० ते ८०० रुपये. एकदा हि चिप लावल्यानंतर प्रिंटर्स पेज कॉऊंटिंग सेटिंग बंद होते.  

        प्रिंटर्स पेज कॉऊंटिंग सेटिंग रीसेट कशी करावी व त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरची माहिती गूगल वर मिळून जाईन.  तसेच प्रिंटर्स चिप आनलाईन शॉपिंगद्वारे मिळेल आणि ते कसे लावायचे याबद्दल YouTube वर माहिती मिळेल.  कंपनी आणि मॉडेल नुसार वरील दोन्ही पध्द्तीत फरक असतो.  तेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रिंटर्सच्या प्रकारानुसार माहिती शोधा.  
tantramarathi.blogspot.in
तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

Rar File and Zip File (1)