Rar File and Zip File (1)
मित्रांनो आपण internet वरून कोणतीही फाईल डाउनलोड करतो आणि ९५ टक्के फाईल ह्या Rar किंवा Zip format मध्ये असतात. तुम्ही नेट वरून font डाउनलोड करा,torrent वरून movie डाउनलोड करा किंवा एखादा सॉफ्टवेअर डाउनलोड करा, सर्व फाईल ह्या Rar किंवा Zip format मध्ये असतात. आज आपण Rar किंवा Zip format म्हणजे काय आणि त्या कश्या ओपन करतात ते जाणून घेणार आहोत.
Rar किंवा Zip ह्यांना Archive File पण म्हणतात. Rar आणि Zip file मध्ये एकापेक्षा जास्त file ठेवता येतात.उदा. एका बॅगमध्ये १० बूक्स ठेवलेली आहे आणि बॅग, चैन (zip) द्वारे बंद केली आहे. बॅगमध्ये बूक्स सुरक्षित आहेत. बॅगमधून हवं ते बूक काढता येते. अगदी याच प्रकारे rar किंवा zip फाईलचं काम चालतं.
Zip file मध्ये File compress करता येते. compress केल्याने file size कमी होतो . त्यामुळे फाईलला जागा कमी लागते. सोबतच downloading,uploading चा डाटा आणि वेळ वाचतो. १० फाईल पेक्षा १ फाईल केव्हाही चांगले
Rar किंवा Zip फाईल ला ओपन करण्यासाठी Winrar, हा सॉफ्टवेअर वापरतात. मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून पुढील पोष्टमध्ये काही सॉफ्टवेअर देणार आहे . ते Rar किंवा Zip या फॉरमॅट मध्ये राहणार आहे. तुम्ही Rar आणि Zip फाईलचा चा नीट अभ्यास करून ठेवा.
Rar, Zip फाईल तयार तसेच ओपन करण्यासाठी (या फाईल ओपन करण्याला Extract करणे असे सुध्दा म्हणतात) Winrar या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. Winrar इथून डाउनलोड करा. (file size १.६८एम बी) आणि इन्स्टॉल करा.
फाईल ओपन करणे
उदा. आपण rar file Extract करणार आहोत. फाईलला right click करा. खालीलप्रमाणे चित्र येईल.
(१) Extract file ... वर क्लिक केले असता Extraction path and options नावाची विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला तुम्हाच्या pc मध्ये जागा निवडायची आहे जिथे या rar file मधील सर्व फाईल save होतील.
(२) Extract Here... वर क्लिक केले असता rar फाईल आहे त्याच ठिकाणी फाईल save होतील.
फाईल Extract करण्याची आणखी एक पध्दत
rar file वर डबलक्लिक करा, खालीलप्रमाणे विंडो ओपन होईल. त्यात लाल रंगात दाखविलेला फोल्डर mouse ने पकडून विंडोच्या बाहेर आणा. बस झालं.
वरील विंडो मध्ये एक फोल्डर आहे. फोल्डर च्या ठिकाणी अनेक फाईल्स असू शकतात.
rar फाईल Extract केल्यानंतर rar फाईलचे जे नाव आहे, त्या नावाचाच फोल्डर तयार होतो व त्यात सर्व फाईल save होतात.
भाग १ समाप्त
अंतिम भाग साठी येथे क्लिक करा.
तुम्हाला
आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या
कळवा, आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या
मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
Comments
Post a Comment