डिस्क डिफ्रॅगमेंट
आज आपण डिस्क डिफ्रॅगमेंट म्हणजे काय ते पाहणार आहे. डिस्क डिफ्रॅगमेंट हा विंडोज कंप्युटर मधील एक महत्वाचा टूल आहे.या टूलने हार्डडिस्क मधील फाईल रिअरेंज करतात. याची माहिती आपल्या सर्वाना असणे आवश्यक आहे. आपला कंप्युटर स्लो चालत असेल तर या टूलच्या वापराने कंप्युटर फास्ट करू शकतो . डिस्क क्लीनअप टूल च्या माहितीसाठी येथे क्लिक करा. कंप्युटर मधील एक बहुमूल्य पार्ट म्हणजे हार्डडिस्क. या हार्डडिस्क मध्ये आपला डाटा आणि कंप्युटरची आपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असते. हार्डडिस्क चांगली असेल तर कंप्युटर व्यवस्थित असेल. आणि या हार्डडिस्कला निरोगी ठेवण्याचे काम डिस्क डिफ्रॅगमें ट हा टूल करत असतो. चित्र क्र. १ सर्वप्रथम हे जाणून घेऊया कि हार्ड डिस्कवर डाटा कसा स्टोर होतो. हार्ड डिस्क ची रचना चित्र क्र. १ प्रमाणे असते. हार्ड डिस्कवर गोल गोल लाईन्स दिसते ते झाले ट्रॅक. या ट्रॅकवर एकामागे एक याप्रमाणे डाटा स्टोर होतो. उदा. A,B,C,D,E या नावाच्या आणि प्रत्येकी १ जी.बी. साईझच्या काही फाईल्स मी हार्ड डिस्क मध्ये स्टोर केल्या, त