ड्राईव्हर बॅकअप

        आपल्या कंप्युटर मध्ये अनेक ड्राईव्हर इन्स्टॉल केलेले असतात.   ड्राईव्हर म्हणजे एक सॉफ्टवेअरच आहे. प्रिंटर ड्राईव्हर, स्कॅनर ड्राईव्हर, मदरबोर्ड ड्राईव्हर, ऑडीओ ड्राईव्हर इत्यादी.  ड्राईव्हर इन्स्टॉल केले नाही तर वरील उपकरण काम करणार नाही.  ऑडिओ ड्राईव्हर इन्स्टॉल केले नाही तर आपल्याला आवाज ऐकू येणार नाही, प्रिंटर ड्राईव्हर इन्स्टॉल केले नाही तर प्रिंट निघणार नाही.   हे सर्व ड्राईव्हर प्रिंटर,  स्कॅनर, विकत  घेतो त्यासोबत एक सी.डी. मिळते त्यामध्ये  असतात. तसेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉप  कंप्युटर विकत घेतो तेव्हा मदरबोर्ड ड्राईव्हर सी.डी. आपल्याला मिळते.  मदरबोर्ड ड्राईव्हर सी.डी.मध्ये अनेक प्रकारचे ड्राईव्हर असतात त्यामुळे ती सांभाळून ठेवावी. 
        
     कंप्युटर फॉरमॅट केल्यानंतर आपल्याला आवश्यकता पडते ती  मदरबोर्ड ड्राईव्हर सी.डी.ची कारण त्यात ऑडीओ ड्राईव्हर सोबतच इतर महत्वाचे ड्राईव्हर असतात.  आपण आपल्या कंप्युटर मधील इन्स्टॉल झालेले ड्राईव्हर बॅकअप घेऊन ठेऊ शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा इन्स्टॉल करू शकतो.  

         ड्राईव्हर बॅकअप घेऊन ठेवणे केव्हाही चांगले कारण अनेकदा आपल्याला ड्राईव्हर ची सी.डी.मिळत नाही किंवा ती खराब झालेली असते.  हा प्रॉब्लेम मदरबोर्ड ड्राईव्हर च्या बाबतीत नेहमी येतो. 


        चला तर मग ड्राईव्हर बॅकअप कसे घेतात ते बघूया.  त्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागेल,  त्याचे नाव आहे डबल ड्राईव्हर.  
       
 हा सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा.  


 Backup घेणे 
सॉफ्टवेअर ओपन करा,
Scan वर क्लिक करा, कंप्युटर मधील ड्राईव्हरची यादी येईल.  सर्व ड्राईव्हर सिलेक्ट करा.  
Backup वर क्लिक करा.
नंतर Browse.. वर क्लिक करून Backupजिथे save करायचे आहे ते स्थान किंवा फोल्डर निवडा आणि Ok करा. आणि परत Ok करा. 

 Backupघेणे सुरु होईल 
 नंतर Backup पूर्ण झाल्याचा मेसेज येईल. 

Backup पूर्ण झालेलं आहे. Backup फोल्डर सुरक्षित ठिकाणी ठेवा. सी ड्राईव्ह सोडून कारण फॉरमॅट करतेवेळी सी ड्राईव्ह मधील डाटा delete होतो. 

Backup Restore करणे 
सॉफ्टवेअर ओपन करा,
Restore वर क्लिक करा,
Locate वर क्लिक करा,
Backup फोल्डर जिथे ठेवले आहे त्या फोल्डरला select करून Ok करा, 
नंतर Restore  वर क्लिक करा, 
नंतर एक वॉर्निंग येईल त्यावर Ok करा, 
थोड्या वेळात
 Backup Restore होईल.

तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 









 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली

Backlist