व्हिडीओ शुटिंग


         मोबाईल फोनमुळे स्वस्तात  व्हिडिओ शूटिंगची सुविधा आपल्या हातात आली आहे.   पण शूटिंग केल्यावर आपण व्हिडिओ पाहतो त्यावेळेस आपला भ्रमनिरास होतो. कारण,  व्हिडिओ मनासारखं नसतो.  याला कारण म्हणजे व्हिडिओ शूटिंग करतांना आपण काही चुका करतो, त्या होय.   चांगले  प्रोफेशनल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी महाग कैमरा आणि एखादा कोर्स केला पाहिजे असे नाही.  आपण स्मार्टफोनच्या सहाय्याने देखील  उत्तम व्हिडिओ शूटिंग करू शकतो.

        चला तर मग, व्हिडिओ शूटिंग कशी करायची ते शिकूया.

      सर्वप्रथम व्हिडिओ शूटिंग करताना मोबाईल उभा कधीच धरायचा नाही. मोबाईल आडवा धरायचा.  व्हिडिओ शूटिंग ही नेहमीच लैंडस्केप मोड मध्येच केली जाते.  


व्हिडिओ शूटिंगच्या ३ बेसिक ऍक्शन  आहेत. 

१ पॅन 

      डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे  हळूवार व्हिडिओ शूट करणे  याला पॅन करणे म्हणतात.  
                        
                          उदा .  येथे क्लिक करा

२ टिल्ट 
      एखादी उंच इमारत शूट करायची आहे. त्या इमारतीला वरून खाली किंवा खालून वर शूट करणे म्हणजेच टिल्ट होय. 

                          उदा . येथे क्लिक करा. 

३ झूम  
      आपण शूट करत असलेल्या वस्तूच्या जवळ जाण्यासाठी किंवा त्याच्या उलट आपण या ऍक्शनचा वापर करतो.   महत्वाची सूचना मोबाईल  द्वारे  व्हिडिओ शूटिंग करतांना झूमचा वापर करू नका, कारण मोबाईल मध्ये डिजिटल झूम असते.   त्याचा वापर केल्यास व्हिडिओ क्लालिटी खराब होते.   
                            उदा.  येथे क्लिक करा

      आणि हो शूटिंग करत असतांना मोबाईल, कॅमेरा स्थिर ठेवा.  मोबाईल साठी ट्रायपॉड स्टॅन्ड मिळते.  त्याच्याने स्थिर व्हिडिओ शूटिंग करता येते .  मोबाईल  ट्रायपॉड स्टॅन्ड ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे.  मोबाईल मध्ये शूटिंग करतांना एयरप्लेन मोड ऑन  ठेवा म्हणजे शूटिंग सुरु असतांना कॉल येणार नाही आणि व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी मेमोरी पुरेशी असल्याची खात्री करा, कारण एच डी व्हिडिओला भरपूर मेमरी लागते

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

Rar File and Zip File (1)