डिस्क डिफ्रॅगमेंट
आज आपण डिस्क डिफ्रॅगमेंट म्हणजे काय ते पाहणार आहे. डिस्क डिफ्रॅगमेंट हा विंडोज कंप्युटर मधील एक महत्वाचा टूल आहे.या टूलने हार्डडिस्क मधील फाईल रिअरेंज करतात. याची माहिती आपल्या सर्वाना असणे आवश्यक आहे. आपला कंप्युटर स्लो चालत असेल तर या टूलच्या वापराने कंप्युटर फास्ट करू शकतो .
कंप्युटर मधील एक बहुमूल्य पार्ट म्हणजे हार्डडिस्क. या हार्डडिस्क मध्ये आपला डाटा आणि कंप्युटरची आपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असते. हार्डडिस्क चांगली असेल तर कंप्युटर व्यवस्थित असेल. आणि या हार्डडिस्कला निरोगी ठेवण्याचे काम डिस्क डिफ्रॅगमेंट हा टूल करत असतो.
चित्र क्र. १
सर्वप्रथम हे जाणून घेऊया कि हार्ड डिस्कवर डाटा कसा स्टोर होतो. हार्ड डिस्क ची रचना चित्र क्र. १ प्रमाणे असते. हार्ड डिस्कवर गोल गोल लाईन्स दिसते ते झाले ट्रॅक. या ट्रॅकवर एकामागे एक याप्रमाणे डाटा स्टोर होतो. उदा. A,B,C,D,E या नावाच्या आणि प्रत्येकी १ जी.बी. साईझच्या काही फाईल्स मी हार्ड डिस्क मध्ये स्टोर केल्या, त्या एकामागोमाग एक असे क्रमवार स्टोर झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी मी B आणि D या फाईल्स डिलिट केली. पण A आणि C, C आणि E यांच्यामध्ये B आणि D या फाईल्स डिलीट करून सुद्धा त्या फाईल्सच्या साईझ एवढी पोकळी (गॅप) निर्माण झाली आहे. म्हणजेच हार्डडिस्कमधील डाटा विखुरलेला आहे. अशीच परिस्थिति संपूर्ण हार्डडिस्क मध्ये असेल आणि अशावेळी एक खूप मोठी फाईल हार्डडिस्क मध्ये स्टोर केली तर ती फाईल जिथे जिथे गॅप असेल त्या ठिकाणी तुकड्यांमध्ये स्टोर होईल . आणि ती फाईल जेव्हा हार्डडिस्क वाचेल तेव्हा हार्डडिस्क मधील हेड त्या तुकड्यांमधील फाईल वाचतांना खूप वेळ घेईल. आणि कंप्युटर स्लो होईल . ( कंम्पुटर स्लो होण्याचे अनेक करणे आहेत. ) हा विखुरलेला डाटा एकसंध करण्यासाठी डिस्क डिफ्रॅगमेंट या टूल चा वापर करतात. हे टूल वापरणे अगदी सोपं आहे आणि त्यासाठी कोणताही सॉफ्टवेअर डाउनलोड करावा लागत नाही. ( डिस्क डिफ्रॅगमेंटसाठी वेगळे सॉफ्टवेअर आहे.त्याची माहिती आपण पुढे येणाऱ्या पोष्ट मध्ये घेऊ. )
चला तर मग डिस्क डिफ्रॅगमेंट कसे करतात ते पाहूया. सर्वप्रथम Windows + E प्रेस करून माय कंप्युटर ओपन करा. आता कोणत्याही एका हार्डडिस्क पार्टीशनला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वर क्लिक करा आणि येणाऱ्या ऑप्शन मधून Tools वर क्लिक करा. आता दुसऱ्या क्रमांकावर Defragment now... असे दिसेल त्यावर क्लिक करा.
चित्र क्र.२
हि प्रोसेस केवळ windows operating system साठीच आहे. macintosh os साठी नाही.
तुमच्या कंप्युटर मध्ये HARD DISK DRIVE हार्डडिस्क असेल तरच डिस्क डिफ्रॅगमेंट करा.
तुम्ही कंप्युटरमध्ये भरपूर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असाल किंवा खूप वापर असेल तर आठवळ्यातुन एकदा डिस्क डिफ्रॅगमेंट करा इतर वेळी महिन्यातून एकदा केले तरी चालेल.
तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा, आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
Comments
Post a Comment