Posts

Showing posts from May, 2017

ऑफलाईन बुकमार्क बॅकअप

Image
                मागील लेखामध्ये आपण ऑनलाईन बुकमार्क बॅकअप कसे घ्यायचे ते बघितले आज ऑफलाईन बुकमार्क बॅकअप कसे घेतात ते बघूया .  आपण कंप्युटर फॉरमॅट करणार असाल तर हि पोष्ट आपल्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते .  कारण कंप्युटर फॉरमॅट करताना   सी ड्राईव्ह मधील सर्व डाटा नष्ट होतो . सर्व प्रोग्रॅम्स फाईल ह्या फॉरमॅट होतात .  ब्राऊजर मधील सेव्ह बुकमार्क आपण लिहून ठेवू शकत नाही कारण बुकमार्क ची संख्या भरपूर असते .       ऑनलाईन बुकमार्क बॅकअप साठी येथे क्लिक करा .          आज आपण ऑफलाईन बुकमार्क बॅकअप   या सॉफ्टवेअर ची माहिती घेऊ या .  या सॉफ्टवेअरने बुकमार्कचे   बॅकअप घेता येते आणि त्याच सॉफ्टवेअरने बुकमार्क रिस्टोर पण करता येते .  ऑफलाईन बुकमार्क बॅकअप   सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा . साईझ११६ के . बी .    बुकमार्क बॅकअप कसे घ्यावे           सॉफ्टवेअर ओपन करा .  ज्या ब्राऊजर मधील   बुक मार्क चा   बॅकअप घ्यायचा आहे त्या ब्राऊजरला सिलेक्ट करा नंतर   Browse... वर क्लिक

विडिओ कनव्हर्टर

Image
         आपला मोबाईल किंवा कंप्युटरवर काही वेळेस व्हिडीओ प्ले होत नाही, त्याचे कारण म्हणजे तो विडिओ फॉरमॅट सपोर्ट  करणारा प्लेयर नसणे होय.  अशा वेळेस काय करायचं ? तर सोपं आहे कंप्युटरवर तो विडिओ कॅनव्हर्ट करायचं.  त्यासाठी आपल्याला एक विडिओ कनव्हर्टर लागेल.  आणि आपली हीच गरज ओळखून मी   तुम्हाला एक सॉफ्टवेअरची माहिती देणार आहे जो आपल्या कंम्पुटर मध्ये नेहमी  असायलाच हवा.                      बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर   या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण कोणताही विडिओ फॉरमॅट आपल्याला हवा त्या फॉरमॅट मध्ये कनव्हर्ट करू शकतो. उदा. .mkv  to  .mp4, .wmv to avi इ. तसेच व्हिडीओ फाईल पासून .mp3 तयार करता येते.  Trim ऑप्शनद्वारे व्हिडीओ कट करता येते. एखाद्या फिल्म मधून तुम्हाला गाणं वेगळं करता येते.  व्हिडीओ क्रॉप करणे, व्हिडीओला इफेक्ट देणे,(उदा. कलर विडिओला  ब्लॅक अँड व्हाईट करणे )दोन व्हिडीओ फाईल जोडणे, सबटायटल अड करणे, व्हिडीओला text किंवा image वॉटरमार्क लावणे, व्हिडीओ फ्लिप करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी या बिगासाफ्ट टोटल व्हिडीओ कनव्हर्टर   या सॉफ्टवेअर मध्ये करता येतात.  

मोबाईल मधील लपलेला खेळ

Image
            आपल्या अँड्रॉइड  मोबाईल मध्ये  एक खेळ लपलेला आहे.  खेळणार का ? आधी त्याला शोधूया.  सापडला का ? चला मी सांगतो.            सर्वप्रथम सेटिंग मध्ये जा. आता खाली एक आप्शन आहे About Phone त्यावर क्लिक करा आता Android version या आप्शनवर वेगात टॅप करा. Android version चा लोगो आला कि त्यावर क्लिक करा. आणखी लोगो येईल त्यावर क्लिक करा खेळ सुरु होईल.  Android version नुसार खेळाचे प्रकार आहेत.  या चित्रामध्ये किटकॅट,लॉलीपॉप आणि मार्शमॅलो या व्हर्जन मधील खेळाचे एकत्रित फोटो दिलाआहेत.          तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली . ते कमेंट्स करा . तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा ,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा . आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या .