ऑफलाईन बुकमार्क बॅकअप
मागील लेखामध्ये आपण ऑनलाईन बुकमार्क बॅकअप कसे घ्यायचे ते बघितले आज ऑफलाईन बुकमार्क बॅकअप कसे घेतात ते बघूया. आपण कंप्युटर फॉरमॅट करणार असाल तर हि पोष्ट आपल्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते. कारण कंप्युटर फॉरमॅट करताना सी ड्राईव्ह मधील सर्व डाटा नष्ट होतो. सर्व प्रोग्रॅम्स फाईल ह्या फॉरमॅट होतात. ब्राऊजर मधील सेव्ह बुकमार्क आपण लिहून ठेवू शकत नाही कारण बुकमार्क ची संख्या भरपूर असते.
आज आपण ऑफलाईन बुकमार्क बॅकअप या सॉफ्टवेअर ची माहिती घेऊ या. या सॉफ्टवेअरने बुकमार्कचे बॅकअप घेता येते आणि त्याच सॉफ्टवेअरने बुकमार्क रिस्टोर पण करता येते.
बुकमार्क
बॅकअप कसे घ्यावे
सॉफ्टवेअर ओपन करा. ज्या ब्राऊजर मधील बुकमार्कचा बॅकअप घ्यायचा आहे त्या ब्राऊजरला सिलेक्ट करा नंतर Browse... वर क्लिक करून बॅकअप जिथे सेव्ह करायचा आहे तो फोल्डर सिलेक्ट करा आणि Backup वर क्लिक करा. यानंतर काही वॉर्निंग येईल त्यावर Ok करा. थोड्या वेळात बुकमार्क बॅकअप घेतल्या जाईल.
बुकमार्क रिस्टोर कसे घ्यावे
हि प्रोसेस पण वरील प्रमाणेच आहे. ब्राऊजर सिलेक्ट करा. नंतर Locate... वर क्लिक करून बॅकअप ज्या फोल्डर मध्ये सेव्ह केला तो फोल्डर सिलेक्ट करा. Restore वर क्लिक करा. येणाऱ्या वॉर्निंग वर क्लिक करा. बस झालं. थोड्या वेळात बुकमार्क रिस्टोर झालेलं असेल.
या छोटाश्या सॉफ्टवेअरने आपण ब्राऊजर मधील सर्व बुकमार्क बॅकअप आणि रिस्टोर करू शकतो.
तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा, आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
Comments
Post a Comment