फायरफॉक्स ब्राऊजर मध्ये YouTube वरील व्हिडिओ डाउनलोड करणे

 

            मित्रांनो, आज आपण फायरफॉक्स ब्राऊजर  मध्ये  YouTube  वरील  व्हिडिओ कसे डाउनलोड करतात ते पाहणार आहोत.   त्यासाठी आपल्या कंप्युटर मध्ये फायरफॉक्स  चा लेटेस्ट ब्राऊजर असणे आवश्यक आहे. ब्राऊजरचे दोन व्हर्जन असतात.   एक म्हणजे बीटा व्हर्जन आणि नार्मल व्हर्ज. तर आपल्याला नार्मल व्हर्जनचे ब्राऊजर हवे आहे,  नसेल तर डाउनलोड करून घ्या. आणि इन्स्टॉल करा.   

      चला तर आपल्या मूळ विषयाकडे वळूया.  

     सर्व प्रथम फायरफॉक्स ब्राऊजर सुरु करा आणि हो इंटरनेट कनेकशन सुद्धा.     इथे   क्लिक करा,  येणाऱ्या पेजवरील उजवीकडे वर  find add ons या बाक्स मध्ये YouTube टाईप करा, टाईप केल्यावर त्या बाक्स खाली काही पर्याय दिसतील  त्यामधून 1-Click YouTube Video Download वर क्लिक करा.  खालील चित्र पहा. त्यातील Add to firefox वर क्लिक करा.  नंतर येणाऱ्या सूचनेला Add करा.  Add Ons डाउनलोड होईल.  आणि इन्स्टॉल होईल



        आता तुमचे अर्धे काम झालेले आहे .   तुम्ही  YouTube    पेज ओपन करा , आणि व्हिडिओ  प्ले करा .  व्हिडिओच्या खाली डाउनलोडचे आप्शन आलेले असेल ,त्याच बरोबर व्हिडिओ रिसोल्युशन आणि त्याला लागणारी मेमोरी सुद्धा दिसत असेल. तुम्हाला हवा असलेला पर्यायावर क्लिक करा आणि व्हिडिओ डाउनलोड करा.  

 मोबाईल मध्ये विडिओ  डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा .  


      या प्रकारचे Add Ons, Chrome ब्राऊजरसाठी उपलब्ध आहे तेही डाउनलोड करून पहा. YouTube वरील व्हिडिओ .mp3 मध्ये  डाउनलोड करण्यासाठी पण Add Ons आहेत.  तसेच इंटरनेट वरील जाहिराती बंद करण्यासाठी Add Ons आहेतच.  

         तुम्हाला हि माहिती कशी वाटली, ते अवश्य सांगा आणि हो हि माहिती शेअर करायला विसरू नका .   

 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली

Backlist