फॉन्ट इंस्टाल करणे

       आज आपण आपल्या कंप्युटरमध्ये फॉन्ट कसे इंस्टाल  करतात ते पाहणार आहे. 
       

कंप्युटर मध्ये जेव्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टाल केली जाते त्या वेळेस काही फॉन्ट आपोआप इंस्टाल होतात.  बहूतेक फॉन्ट English भाषेसाठी आणि फॉर थोडी इतर भाषेसाठी असतात. तुम्हाला मराठी टाईप करायची असेल तर krutidev फॉन्ट्स इंस्टाल करावे लागेल  किंवा देवनागरी फॉन्ट इंस्टाल करावे लागेल . त्याच बरोबर स्टायलिश किंवा डिझायनर फॉन्ट इंस्टाल करायचे असेल तर नेट वरून डाउनलोड करून किंवा दुसऱ्या कॉम्पुटर मधून कॉपी करून आपल्या कंप्युटर मध्ये इंस्टाल करावे लागेल. 


    गुगल वर font असे सर्च करा. त्यानंतर येणाऱ्या वेबसाईट मधून तुम्ही हवा तो फॉन्ट डाउनलोड करू शकता.  फॉन्ट डाउनलोड करताना ते रर किंवा झिप फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल.  रर किंवा झिप फॉरमॅट मधून आपली फॉन्ट फाईल  Extract ( वेगळी ) करायची ते बघण्यासाठी येथे क्लिक करा. फॉन्ट फाईल चा साईझ १० kb ते १ mb पर्यंत असू शकतो. 


             फॉन्ट इंस्टाल करताना फॉन्ट फाईल वर क्लिक करा, एक विंडो ओपन होईल, त्यात डावीकडे वर print आणि install हे option दिसतील.  तुम्ही install वर क्लिक करा.  फॉन्ट इन्स्टॉल होईल.  आता तुम्ही  इंस्टाल केलेल्या फॉन्ट मध्ये टाईप करू शकता.  अगदी याच प्रकारे तुम्ही मराठी फॉन्ट सुद्धा डाउनलोड करून इंस्टाल करू शकता.   


            आता दुसऱ्या कंप्युटर मधून फॉन्ट कसे कॉपी करायचे ते बघूया.  ज्या  कंप्युटरमधून  फॉन्ट कॉपी करायचा आहे त्या कंप्युटर मधील C ड्राईव्ह ओपन करा.  नंतर उजवीकडे वर Search Loc... येथे क्लिक करा आणि Font टाईप करून एंटर कि प्रेस करा. त्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.  त्यातील पहिला फोल्डर ओपन करा,  त्यात तुम्हाला त्या कंप्युटर मधील सर्व फॉन्ट दिसतील.  तुम्हाला हवे असलेले फॉन्ट  पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून घ्या. आणि आपल्या कंप्युटर मध्ये इंस्टाल करा.  बस झालं




( फॉन्ट फाईल चा extention .ttf किंवा .otf असतो. .ttf  म्हणजे true type font आणि .otf म्हणजे open type font )

       तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

Rar File and Zip File (1)