फॉन्ट इंस्टाल करणे

आज आपण आपल्या कंप्युटरमध्ये फॉन्ट कसे इंस्टाल करतात ते पाहणार आहे. कंप्युटर मध्ये जेव्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टाल केली जाते त्या वेळेस काही फॉन्ट आपोआप इंस्टाल होतात. बहूतेक फॉन्ट English भाषेसाठी आणि फॉर थोडी इतर भाषेसाठी असतात. तुम्हाला मराठी टाईप करायची असेल तर krutidev फॉन्ट्स इंस्टाल करावे लागेल किंवा देवनागरी फॉन्ट इंस्टाल करावे लागेल . त्याच बरोबर स्टायलिश किंवा डिझायनर फॉन्ट इंस्टाल करायचे असेल तर नेट वरून डाउनलोड करून किंवा दुसऱ्या कॉम्पुटर मधून कॉपी करून आपल्या कंप्युटर मध्ये इंस्टाल करावे लागेल. गुगल वर font असे सर्च करा. त्यानंतर येणाऱ्या वेबसाईट मधून तुम्ही हवा तो फॉन्ट डाउनलोड करू शकता. फॉन्ट डाउनलोड करताना ते रर किंवा झिप फॉरमॅट मध्ये डाउनलोड होईल. रर किंवा झिप फॉरमॅट मधून आपली फॉन्ट फाईल Extract ( वेगळी ) करायची ते बघण्यासाठी येथे क्लिक करा. फॉन्ट फाईल चा साईझ १० kb ते १ mb पर्यंत असू शकतो. ...