गाण्याचं साईझ कमी करणे

           आपण मोबाईल किंवा ईतर mp3 प्लेयर मध्ये गाणे ऐकतो. SD CARD, पेनड्राइव्ह मध्ये गाणे स्टोर करून ठेवतो.  गाण्याच्या फाईल भरपूर असल्यामुळे SD CARD, पेनड्राइव्ह पॅक होते.  मग काही गाणे delete करावं लागते.  गाणे delete न करता mp3 फाईलचं  साईझ कमी करता आलं तर...  नक्कीच. mp3 फाईलचे साईझ कमी करता येते.   आज आपण याच विषयावर माहिती घेणार आहे.   

MP3  TOOLKIT  बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा

         MP3 Resizer हा सॉफ्टवेअर mp3 फाईल चा साईझ कमी करतो.   अगदी ८ एम. बी. वरून २ एम. बी.  पर्यंत  साईझ कमी करू शकतो.  म्हणजेच ३०० गाणे असतील तर त्या जागी १००० ते १२०० गाणे सहज बसू शकतात.  हा सॉफ्टवेअर वापरायला सोपं आहे आणि त्याचा साईझपण कमी आहे.  त्यामुळे आपला कंप्युटर हँग होणार नाही.   

हा सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा.   साईझ  ३ एम. बी. 


          Add File वर क्लिक करून  mp3 फाईल सिलेक्ट करा. नंतर लाल चौकटीत क्लिक करून  bitrate कमी करा.   bitrate कमी केलं कि फाईल साईझ कमी होते. त्यानंतर खाली निळ्या आणि पोपटी रंगात  आधीची फाईल आणि नवी फाईल यांत तुलना केलेली दिसेल .    त्यावरून कळेलच कि फाईलसाईझ  किती कमी होते ते. नंतर हिरव्या चौकटीत Resize  वर क्लिक करा.  थोड्या वेळात फाईल साईझ कमी होईल.  

      याप्रकारे तुम्ही गाण्याची साईझ कमी करा आणि कमी जागेत भरपूर गानी भरा.  


तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

कंप्युटरची कुंडली

Backlist