MOBILE MIKE

MOBILE MIKE

       
       शिर्षक ऐकून तुम्हाला अंदाज आलेला असेल हि पोष्ट कशावर आधारित   आहे ते.  अगदी बरोबर मित्रांनो.  आपल्या कंप्युटरला आपण माईक जोडणार आहे,  आणि माईक असेल आपला मोबाईल. 

          मोबाईल माईक कंप्युटरला तीन प्रकारे जोडता येते. USB CABLE,  BLUE  TOOTH,  आणि  WI-FI द्वारे.   त्यासाठी आपल्याला काही सॉफ्टवेअर लागेल एक मोबाईलसाठी, एक कंप्युटरसाठी सोबतच driver.  हे तिनही सॉफ्टवेअर इथून डाउनलोड करा.(file size 4.68MB)  ( rar file च्या माहितीसाठी  येथे क्लिक करा )  
          rar फाईल मध्ये तीन सॉफ्टवेअर आहेत.  Wo Mic नावाचे सॉफ्टवेअर मोबाईल मध्ये इंस्टॉल करा,wo_mic_client_setup आणि wo_mic_driver_signed हे सॉफ्टवेअर कंप्युटरमध्ये इन्स्टॉल करा. 

           
       
     आता आपण usb cable ने  मोबाइल माईक कसं  connect  करायचं ते पाहणार आहोत.

         सर्वप्रथम मोबाईल setting मध्ये जाऊन usb debugging हा enable/on करा. त्यानंतर मोबाईल मध्ये Wo Mic अप ओपन करा आणि खाली दाखविल्यानुसार START वर क्लिक करा. 



    कंप्युटर मध्ये Wo Mic अप ओपन  करा व Connection वर क्लिक करा. नंतर connect वर क्लिक करा. 



त्यानंतर USB वर क्लिक करा.आणि Ok करा. 



आता Options मध्ये जाऊन Play in speaker वर  करा.


  

       बस झालं.  आता मोबाईल  माईक म्हणून वापरू शकतो. 


       याच प्रमाणे BLUE  TOOTH,  किंवा   WI-FI वापरून सुध्दा मोबाईल connect करता येईल. BLUE  TOOTH,  किंवा   WI-FI द्वारे connect करण्यासाठी आपल्या कंप्युटरमध्ये BLUE  TOOTH,  किंवा   WI-FI असणे आवश्यक आहे.  नसेल तरी काही हरकत नाही BLUE  TOOTH,  WI-FI अडाप्टर १५० रुपयापासून मिळते. ते विकत घेऊन connect करा. मोबाईल आणि कंप्युटरमध्ये प्रोग्रॅम्स सुरु करा.   मोबाइल कश्याने  connect  केला तो प्रकार सिलेक्ट करा. 
         BLUE  TOOTH,  WI-FI द्वारे   mobile connect केला असेल तर मोबाइलला आणि कंप्युटरमध्ये BLUE  TOOTH,  WI-FI  सुरु करा. आणि Cardless Mike चा आनंद घ्या.  



तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा.  आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली