Computer Screen Snap



        आज आपण कंप्युटर स्क्रीनचा फोटो कसा घ्यायचा ते पाहणार आहे.  आपण कंप्युटर वर online व्यवहार करतो, money transfer करतो, recharge करतो, E -mail करतो इ.     यासर्वांचा पुरावा म्हणून कंप्युटर स्क्रीनचा फोटो  आपल्या जवळ असलेलं बरं.  
                   काही किबोर्ड किचा  वापर कसा यासाठी येथे क्लिक करा
         चला तर मग कंप्युटर स्क्रीनचा फोटो कसा घ्यायचाते बघू.  आपल्या कीबोर्डवर Print Screen SysRq नावाचे एक बटन आहे. ते बटन प्रेस करा.  आता Paint Programs ओपन करा, आणि Ctrl +V प्रेस करा. म्हणजेच Paste करा.   Paint Programs मध्ये स्क्रीनचा फोटो आलेला असेल. तुम्हाला पूर्ण फोटो Save करायचा असेल तर  Ctrl +S करा  किंवा  Paint Programs मध्येच वर View च्या जवळ Crop नावाचे option दिसेल त्यावर क्लिक  करा आणि mouse ने फोटोवर तुम्हाला हवा तेवढा भाग ओडून काढा, त्यानंतर Right Click करून Crop वर क्लिक करा आणि Save करा.  

                  


           अश्याप्रकारे तुम्ही कोणत्याही प्रोग्राममधील स्क्रीनचा फोटो घेऊ शकता. तुमच्या कंप्युटर मध्ये काही प्रॉब्लेम्स आला तर त्या प्रॉब्लेम्सचा screen snap घेऊन तो एक्सपर्टला दाखवून प्रॉब्लेम्स सोडवू शकता. 


         तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवा,  आणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली