ऑनलाईन बुकमार्क बॅकअप्स


         कंप्युटर वर आपण वेब ब्राऊजिंग करतो.  वारंवार वेब ऍड्रेस टाईप करावे लागू नये म्हणून तो वेब ऍड्रेस बुकमार्क म्हणून सेव्ह करून ठेवतो. (  वेबपेज सुरु असताना Ctrl +D प्रेस केलं की उजव्या बाजूला वर एक विंडो ओपन होते Done वर क्लिक केल्यावर बुकमार्क सेव्ह होतो. )   आपल्या घरच्या कंप्युटर वर असे १५ -२० बुकमार्क असतात. जेव्हा आपण बाहेर जातो मित्राकडील कंप्युटर किंवा  ऑफीस  मधल्या कंप्युटरवर काम करतो म्हटलं  कि बुकमार्क आठवत नाही .

        आज याच समस्येवर मी एक उपाय सांगणार आहे.   www.xmarks.com  या वेबसाईटवर जाऊन  साईन अप करा आणि आपला अकॉउंट बनवा.  नंतर  Install Now वर क्लिक करून एक्स्टेंशन डाउनलोड करा तुम्हच्या  ब्राऊजर मधील सर्व बुकमार्कचा ऑनलाईन  बॅकअप्स घेतला जाईल.

     नंतर तुम्ही कुठेही जा कोणत्याही कंप्युटर मधून www.xmarks.com या वेबसाईटवर लॉगिन करा आणि My Bookmarks या  मेनूवर क्लिक केलं की तुमच्या घरच्या कंप्युटरमधील सर्व बुकमार्क मिळतिल. 



तुम्हाला आजची पोष्ट कशी वाटली. ते कमेंट्स करा. तुमच्या काही समस्या असेल त्या कळवाआणि हि पोष्ट इतर social networking site वर share करा. आपल्या मित्रांना या ब्लॉगची माहिती द्या.
 

Comments

Popular posts from this blog

पी. डी . एफ . फाईल तयार करणे

Backlist

कंप्युटरची कुंडली