Posts

Showing posts from August, 2017

लेजर प्रिंटर्स पेज कॉऊंटिंग सेटिंग

Image
        आज आपण लेजर प्रिंटर्सच्या पेज कॉऊंटिंग  सेटिंग बद्दल माहिती घेणार आहे .  माझ्याकडे Samsung ML १६४० हा प्रिंटर्स आहे.  ७ वर्षांपासून मी हा प्रिंटर्स वापरत आहे. काही प्रॉब्लेम्स नाही.   लेजर प्रिंटर्स इतर प्रिंटर्स पेक्षा वेगवान आणि प्रिंटाऊट परवडणारी असते. केव्हाही तुम्ही प्रिंट काढा,इंकजेट  प्रिंटर्स प्रमाणे हा दगा  देणार नाही.            आता महत्वाच्या मुद्द्यावर बोलू, या प्रिंटर्सद्वारे मी पहिल्या  २००० प्रिंट्स काढल्या, त्यानंतर प्रिंट येणं बंद झालं. मी कार्टीज चेक केलं. प्रिंटर्स केबल चेक केलं सगळं ठीक होतं पण प्रिंट  येत नव्हती.  असं का झालं असेल. मग मी नेटवर याबाबत शोध घेतला.  त्यावर मला उत्तर मिळालं. ते असं .            प्रिंटर्स निर्माता कंपनीने प्रिंटरमध्ये पेज कॉऊंटिंग सेटिंग करून ठेवलेली असते, ती अशी कि २००० प्रिंट्स निघाल्या कि पुढील प्रिंट्स निघणार नाही .  मग तुम्हाला नवीन कार्टीज विकत घ्यावे लागेल. जेणेकरून कंपनीचा फायदा व्हावा.   प्रिंटर्स ४-५ हजाराला आणि कार्टीज दिड -दोन हजाराला. हे काही परवडणारे नाही.  प्रत्येकवेळी कार्टीज घेणं परवडणार नाही.  मग यावर दो