Posts

Showing posts from September, 2017

एम. एस.ऑफीस 2007 मधील फाईल pdf मध्ये सेव्ह करणे

Image
         आज आपण एम. एस.ऑफीस 2007 मधील फाईल pdf मध्ये सेव कसे करतात ते पाहणार आहोत.  एम. एस.ऑफीस 2007 नंतर आलेल्या काही लेटेस्ट व्हर्जन मध्ये हि सुविधा इनबिल्ट असते. पण एम. एस.ऑफीस 2007 मध्ये हि सुविधा नाही.  एम. एस.ऑफीस 2007 हे वापरायला खूप सोपे आहे, त्यामुळे नवीन व्हर्जन आलेले असले तरीही  बरेच जण एम. एस.ऑफीस 2007 वापरतात. यात इनबिल्ट pdf मध्ये फाईल सेव्ह  करण्याची सुविधा नाही.  पण आपण एका छोट्याशा सॉफ्टवेअर च्या मदतीने एम. एस.ऑफीस 2007 मधील  फाईल pdf फॉरमॅट मध्ये सेव्ह करू शकतो. तो सॉ फ्टवेअर   ऍड-इन्स या प्रकारातील आहे.        पि.डी.एफ. फाईल कशी तयार करतात ते माहित करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.       खालील चित्र पहा. हे चित्र ऍड-इन्स इंस्टॉल करायच्या आधीचे आहे. तुम्ही तपासणी करून घ्या. बॉक्स मधील पर्यायावर क्लिक केले असता एक विंडो येईल त्यात ऍड-इन्स  बद्दल माहिती दिलेली असेल. चला आता ऍड-इन्स इंस्टाल करूया.      ऍड-इन्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. फाईल साईझ ९३४ केबी  ऍड-इन्स डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यावर खालीलप्रमाणे पर्याय येईल.